शहरातील एटीएमची सुरक्षा वाऱ्यावर; देवळाई, पाडेगाव नंतर रांजणगावात एटीएम फोडण्याचा प्रयत्न

Foto
औरंगाबाद- देवळाईतुन एटीएम लंपास केले त्यानंतर पाडेगाव येथे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्याची घटना ताजी असताना शेनपुंजी रांजणगाव येथे पुन्हा एकदा एक्सिस बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे.

२५ लाख रुपये रोकड ने भरलेलं  एसबीआय चा अख्ख एटीएमच चोरट्यानी शनिवारी देवळाई भागातून पळविले होते  त्यानंतर चोवीस तासातच पाडेगाव येथील एसबीआयचेच एटीएम गॅस कटर ने फोडण्याचा प्रयत्न झाला होता. या घटनेला तीन दिवस उलटत नाहीत तर पुन्हा एकदा असाचकाही प्रकार वाळूज औधोगिक वसाहतीत घडला.

वाळूज मधील शेनपुंजी रांजणगाव भागात असलेल्या एक्ससिस बँकेचे एटीएम मध्यरात्रीच्या सुमारास  फोडण्याचा प्रयत्न झाला.एटीएमचे लॉक तोडता न आल्याने चोरट्यांचा प्रयत्न फसला. ही घटना आज सकाळी उघडकीस आली.त्या नंतर पोलीस आयुक्तनि घटनस्थळी भेट दिली.पोलीस परिसरातील सीसीटीव्ही ची तपासणी करीत असून चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे.

तिन्ही घटनेतील आरोपी   शोधण्यात यश नाही..
मागील पाच दिवसात देवळाई, पाडेगाव, रांजणगाव अशा तीन ठिकाणचे एटीएम चोरट्यानी लक्ष केले. या एटीएम चोरट्याच्या शोधा साठी पोलिस जंग जंग पछाडत आहेत मात्र अद्याप पोलिसांना चोरटे निष्पन्न झालेले नाही हे चोरटे परराज्यातील असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker